आमच्या बद्दल श्री. छ.शि.शि. संस्था व्यवस्थापन संकेत संशिप्त
प्रवेश नियम
 १. प्रवेश घेण्यासाठी विहित नमुन्यातील ‘ प्रवेश नोंदणी अर्ज ’ आवश्यक त्या प्रमाणित सत्यप्रतीसह व प्राचार्याच्या अनुमती दर्शक स्वाक्षरीसह कार्यालयात जमा करावी .
२. प्रवेश अर्जा सोबत खालील मूळ प्रमाण पत्रे व प्रत्येकी दोन सत्यप्रती सादर कराव्यात .
    अ) गुणपत्रिका
   आ) शाळा / महाविद्यालय सोडल्याचा दाखला .
    क) उत्पन्नाचा दाखला
    ख) जातीचे प्रमाणपत्र.
    ग) स्थलांतर प्रमाणपत्र .
३. ‘प्रवेश नोंदणी अर्ज’ जमा झाल्यानंतर शासनाच्या गुणानुक्रम व आरक्षण नियमांनुसार पात्र विद्यार्थ्यांची यादी आणि प्रतीक्षा यादी फलकावर लावण्यात येईल.
४. मुख्य यादीतील विद्यार्थ्यांना दिलेल्या मुदतीत प्रवेश घ्यावा लागेल. त्या मुदतीनंतर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल.
५. त्याच वर्गात पुनः प्रवेश घेणार्या विद्यार्थ्यांना संपूर्ण वार्षिक शुल्क प्रवेश घेतांनाच भरावे लागेल.
६. कोणत्याही कारणास्तव प्रवेश रद्द करायचा असल्यास तशा आशयाचा लेखी अर्ज कार्यालत सादर करावा.प्रवेश रद्द करतेवेळी विद्यार्थ्यांना संपूर्ण शुल्क भरावे लागेल.
७. प्रवेश होण्यापूर्वी महाविद्यालयातील सर्वच नियमांचा व संहितेचा अभ्यास करून योग्य विषयाची निवड करून प्रवेश व प्रवेश – अर्जावर पालकाची स्वाक्षरी घेवून प्रवेश घ्यावा.
मुख्य पान |आमच्या बद्दल |प्रतिक्रिया | संपर्क | स्थानीय व्यवस्था समिति | कार्यरत महाविद्यालय समीती|प्रवेश प्रक्रिया
© श्री छत्रपती शिवाजी शिक्षण संस्था - सर्व अधिकार आरक्षित संकेतस्थळ कर्ता : ३डी सर्विसेस    | तपासा ई-मेल